---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर धरणगाव महाराष्ट्र

पाळधीजवळ ट्रॅव्हल्स उलटली, २५ जखमी, पालकमंत्री पोहचले मदतीला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ मे २०२३ | जळगाव – धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास खाजगी बस पलटी होवून अंदाजे २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहे.

IMG 20230604 WA0156 jpg webp webp

यावेळी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात असतांना त्यांना हा अपघात दिसून आला असता त्यांनी तत्काळ जखमी प्रवाशांना बाहेर काढत मदतीचा हात देत रुग्णवाहिकेला बोलवून रुग्णालयात रवाना केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथून अहमदाबाद येथे जाण्यासाठी बस क्रमांक जीजे.१८.बीव्ही.३०४२ ही निघाली होती. धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात अंदाजे २५ ते ३० जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात १७ जखमींना आणण्यात आले आहे.पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे देखील रात्री याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स दिसून आली.

---Advertisement---

पालकमंत्री यांनी लागलीच आपल्या वाहनांचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण केले. पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जैन कंपनीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या १७ जखमींना आणण्यात आले असून सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपचार करण्यास पुढे सरसावले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---