---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा

पाचोरा : शिवसेनेकडून अजित पवारांचे जंगी स्वागत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । पाचोरा मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्‍या भगिनी तसेच शिवसेनेच्‍या नेत्‍या वैशाली सूर्यवंशी यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पाचोऱ्यात जंगी स्वागत केले. यावेळी अजित पवार यांचे सूर्यवंशी यांनी औक्षण केले.

अजित पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या समवेत अजित पवार हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

VAISHLI SURYAVANASHI jpg webp

अजित पावर यांचे पाचोरा शहरात आगमन होण्यापूर्वीच शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी औक्षण करून पुषगुच्च देत स्वागत केले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

---Advertisement---


Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---