‘पहिलं तू सुधर म्हणा बाबा’ गुलाबराव पाटलांचा चंद्रकांत खैरेंना टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो’ अशा शद्बात मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला.
शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. जर शिंदे गटाचे 50 आमदार निवडून आले तर मी हिमालयात जाईल असं वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले कि, ‘पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो’ अशा शद्बात गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.
याच बरोबर गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘वंदे मातरम् म्हणण काय वाईट आहे. तुम्ही ज्या मातीत राहातात तिला नमन करण म्हणजे वंदे मातरम् .इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् बोलना होगा’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.