⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दहावी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । शासकीय तंत्रनिकेन, जळगाव मध्ये दहावी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यास विद्यार्थी पालक यांनी उपस्थित राहून चांगलाच प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात डिप्लोमाच्या ची प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज कसा भरावा, कोण कोणती कागदपत्रं अपलोड करावी, राऊंडस कसे होतील, ऑप्शन फॉर्म कसे भरावेत अशा काही महत्वपूर्ण बाबी प्राचार्य डॉ पराग पाटील यांनी समजावून सांगितल्या. त्यानंतर प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक श्री पी पी गडे यांनी प्रत्यक्ष फॉर्म कसा भरावा याचे लाईव्ह प्रात्यक्षिक (डेमो) करून दाखविले. तसेच विद्यार्थी पालक यांनी विचारलेल्या शंकांचे निराकरण केले. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरू आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रथम वर्ष प्रवेश समितीतील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.