चाळीसगाव येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज | २१ सप्टेंबर २०२१ | चाळीसगाव शहरातील २२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौक येथील महेश विजयसिंह राजपूत (वय-२२) या तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान महेश याच्या मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वार्डातील नगरसेवक प्रदिप सत्यवान राजपूत यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा महेश याचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावर त्यांनी घडलेल्या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलिसात कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. नगरसेवक प्रदिप राजपूत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.
00000