जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि गोरखपूरदरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने भुसावळकर प्रवाशांनो दिलासा अमिळ्णार आहे.
गाडी क्रमांक ०५३२५ गोरखपूर ते एलटीटी विशेष २६ एप्रिलपासून १० मेपर्यंत (फक्त २७ एप्रिल वगळून) दररोज रात्री ९.१५ गोरखपूर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७५३२६ एलटीटी-गोरखपूर विशेष २८ एप्रिल ते १२ मे (फक्त २९ एप्रिल वगळून) दरम्यान दररोज सकाळी १०.२५ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता गोरखपूर स्थानक येथे पोहोचणार
या स्थानकांवर असेल थांबा :
ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबेल.
या गाडीला 2 वातानुकूलित-III टियर, 12 स्लीपर क्लास, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.