जिल्ह्यात केळीला भाव मिळत नसल्याने बळीराजा संकटात !

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. जिल्हा हा केळीसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मात्र सध्या याच केळीला भाव मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

banana cmv

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याचे उत्पन्न, मजुरी व इतर उत्पन्नाचे साधन हे केळीवर अवलंबून आहे. वादळामुळे शेतकरी धास्तावलेल्या अवस्थेत केळीचे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना केळी कापणीची विनंती करत आहे.

याचाच फायदा व्यापारी घेत असून, कापणीवर आलेली केळीची अत्यंत कमी दरात मागणी करीत आहेत. यावर्षी केळीला चांगला भाव असल्यामुळे शेतकरी आनंदीत होता. परंतु वातावरणाने केळी तीन हजारांवरून थेट ८०० रुपये क्विंटलवर आली आहे.

यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याची स्थिती असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवून दिलेल्या भावात केळी न खरेदी करता मनमानी भावात केळी खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now