हे अपेक्षित नव्हतं.. ! शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर मंत्री अनिल पाटीलांची प्रक्रिया ; काय म्हणाले वाचा..

एप्रिल 13, 2024 1:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज : १३ एप्रिल २०२४ : शरद पवार यांनी सूनेत्रा पवार यांना त्या बाहेरच्या असल्याचे म्हटल होते. मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचे शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

sharad pawar anil patil jpg webp

काय म्हणाले अनिल पाटील?
“शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे राज्यभरातील सूनांचा अपमान झाल्यासारखं असल्याचं मला वाटतं आहे. कुठल्याही सुनेला लेकीप्रमाणे वागावं, सुनेला लेकीप्रमाणे दर्जा द्यावा, असं शरद पवार यांनी म्हणणं अपेक्षित आहे”, असं मत अनिल पाटील यांनी मांडलं

“सूना ह्या बाहेरच्या असतात असं सांगणं कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. महिलांना प्राधान्य देणाऱ्या शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं. केवळ पुत्र प्रेम राहील म्हणून आपल्या सुनेला तिरस्काराच्या वागणुकीचं वक्तव्य येत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन या राज्यात कोणीही करू शकत नाही”, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.

अनिल पाटलांकडून खडसेंचं महायुतीत स्वागत
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. खडसे यांना विधान परिषदेत उमेदवारी द्यावी इथपर्यंत शरद पवार यांचा निर्णय योग्य होता. तसेच खडसे यांना विधान परिषदेत निवडून आणण्याचं कर्तव्य अजित पवार यांनी पार पडलेलं आहे. त्यामुळे खडसे आता महायुती येत असतील तर आम्हाला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर दिली. तसेच कार्यकर्त्यांचा आपआपल्या नेत्यावर विश्वास असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं जाईल. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील”, असा विश्वासही मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now