ग्राहकांच्या हितासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने कार्य करा : अजय भोसरीकर
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । ग्राहकांच्या हितासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी सदैव तत्परतेने कार्य करावे असे प्रतिपादन अजय भोसरीकर यांनी केले. पांझरा गोशाळा येथे ग्राहक स्वरक्षण समिती आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातुन ते बोलत होते.
प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष विजय काबरा, अजय भोसरीकर अध्यक्ष वीज ग्राहक तक्रार निवारण मंच नासिक व सदस्य पुणे, प्रांत जागरण प्रमुख विजय मोहरीर, जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख, जिल्हा संघटक तळेले, जिल्हा सचिव ॲड सुभाष तायडे, जिल्हाउपाध्यक्ष दिनेश तायडे, कपिला मुठेसह कोषाध्यक्ष जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ, बँक सायबर क्राईम समितीप्रमुख विजय शुक्ला, जयतलाल वानखेडे, एरंडोल तालुका अध्यक्ष शिवाजीराव अहिरराव, संघटक संजय चौधरी, सुनीता पाटील, बोदवड अध्यक्ष संजय अग्रवाल, गोगावले ॲड.ईश्वर पाटील, ॲड.धनराज पाटील, रावेर सुधाकर पाटील, ॲड.देवेंद्र जाधव, जळगाव महानगर प्रतिनिधी निर्मला देशमुख, ॲड.मनीषा पाटील, सुनीता चित्ते, वंदना पाटील, ताईसाहेब प्रतिभा, सूर्यवंशी, मंगलाताई बियाणी, प्रतिभा पाटील, बाळकृष्ण वाणी मंदाकिनी वाणी, विद्या ताई सूर्यकांत पाटील यावल ,सविता माळी, मनोज भांडारकर,अमिनोदिन शेख मुनाफ शेख हे उपस्थित होते.
कार्य क्रमाचे सुरुवात विजय काबरा, अजय भोसरीकर, जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते व उपस्थित सर्वांनीच विजय काबरा व्यवस्थापक पांजरपोळ यांनी मंत्रोपचारत गोपूजन आरती ,गोचरण पूजन ,पुष्प अर्पण करून अत्यंत मांगल्य पूर्ण रीत्या सोहळा पार पडला. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते ग्राहक तीर्थ बिंदू नाना जोशी व आद्य दैवत श्री स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन , माल्यारपण व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात कपिला मुठे यांनी सुश्रव्या आवजात ग्राहक संघटन मंत्राने केली. त्या नंतर डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते अजय भोसरीकर अध्यक्ष वीज ग्राहक तक्रार निवारण मंच नासिक व ,पुणे सदस्य यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विजय मोहरीर प्रांत जागरण प्रमुख यांचे हस्ते प्रमुख मान्यवर गोशाळा पांजरपोळ ट्रस्टी चेअरमन विजय काबरा यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रास्तविक वर भाषणात डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत चा 13 तालुक्यातील विस्तारितकार्य ऑनलाईन सदस्य नोंदणी ,एकूण सदस्यता ,ग्राहक प्रश्नांची सोडवणूक, प्रबोधन ,प्रचार ,प्रसार कार्य तसेच प्रमुख पाहुणे यांचा परिचय करुन दिला.
मुख्य मार्गदर्शक अजय भोसरीकर अध्यक्ष वीज ग्राहक तक्रार निवारण मंच व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मार्गदर्शक यांनी बिंदू नाना यांचे ग्राहक चळवळीतील योगदान ,कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी संघटनात्मक बांधणी व कार्य करीत असताना घ्यावयाची काळजी यावर विस्तृत मार्गदर्शन केले.त्या नंतर उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक शंका समाधान करण्यात आले. सुनील वाघ, शिवाजीराव अहिरराव,बाळकृष्ण वाणी या मान्यवरांनी ही मनोगतात आपले विचार प्रगट केले. या स्तुत्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव ॲड.सुभाष तायडे यांनी तर आभार प्रदर्शन संघटक जगन्नाथ तळेले यांनी केले.