भादली येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

मे 13, 2021 8:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जळगाव तालुक्यातील भादली येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली. किशोर रमेश नारखेडे (वय-४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

भादली येथील किशोर नारखेडे हे आपल्या वृध्द आईसोबत राहतात. दरम्यान, त्यांनी काल १२ मे रोजी रात्री ११ वाजता आईसोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री आई झोपेत असतांना किशोर नारखेडे यांनी राहत्या घरात दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे त्यांची आई सकाळी उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे उघड झाले.

गावातील पोलीस पाटील ढाके यांनी तत्काळ नशिराबाद पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस कर्मचारी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now