जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । अपघात झाल्याचा बनवा करून अज्ञात भामट्यांनी चक्क २ लाख ८५ हजार ५०० रु. मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल असून या प्रकरणात सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमित अग्रवाल (वय ४१, नूतन अजिंठा हौसिंग सोसायटी, पार्कनगर, गिरणा टॉकीजवळ, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली. अग्रवाल यांचा एमआयडीसी परिसरात विनायक ऑईल कार्पोरेशन नावाचा सोया रिफाईंड तेलाच्या होलसेल विक्रीचा उद्योग आहे. अग्रवाल यांच्या धावत्या कारला मागच्या बाजूने धडक देऊन अपघाताचा बनाव करत सुरुवातीला मदतीची याचना व नंतर चाकूच्या धाकावर मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल हिसकावून नेले. या प्रकरणी अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांनतर सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

घटना अशी घडली
अग्रवाल हे दि. 20 20 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे अमित अग्रवाल हे त्यांचे वडील व कारचालकासह कारने घरी येण्यास निघाले. त्यांच्यासोबत दिवसभराच्या तेल विक्रीचे 2 लाख 49 हजार 800 रुपयांची रोकड होती. वाटेत विज मंडळाच्या सब स्टेशनजवळ एका दुचाकीने त्यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. या धडकेत कुणाला काही लागले आहे का हे बघण्यासाठी अमित अग्रवाल हे खाली उतरले. त्यावेळी बाजुला एक मोटार सायकल पडलेली असल्याचे त्यांना दिसले. त्या मोटार सायकलजवळ तिन इसम त्यांना दिसले.











