गटारीच्या प्रवाहात भोपळा टाकून मनसेचे अनोखे आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद शहरात गटार कचऱ्याने तुडुंब भरली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध व्यक्त करत गटारीच्या प्रवाहात कोरडा भोपळा सोडण्यात आला.
नशिराबाद येथील नगरपंचायत प्रशासन रिकाम्या भोपळ्यासारखे कर्तव्यशून्य आहे. हे दर्शविण्याचा मनसेने या माध्यमातून प्रयत्न केला आहे. भोपळ्याला “रिकामा” अशी उपमा ग्रामीण भागात दिली जाते. भोपळा आंदोलनामागे “निष्क्रिय व सुस्त” प्रशासन असल्याचे आम्हाला दाखवून द्यायचे आहे. असे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे प्रशासन यापासून बोध घेऊन गटारीचे काम करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शहर अध्यक्ष जितेंद्र बच्चाटे, शहर सचिव गोकुळ धनगर, सचिन भालेराव, लक्ष्मण तायडे, तेजस कोळी, संजय कोळी, गजेंद्र माळी, दुर्गेश वाघुळदे, तसेच मनसे कार्यकर्ते गणेश कोळी, शुभम सोनार, प्रशांत कोलते, चेतन चौधरी, मनोज पाटील सुभाष सुतार, दिलीप सुतार, सुनील रंधे, सुनील पवार, संजय जंजाळ उपस्थित होते.