जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । यंदा २९ जून रोजी आषाढीला पंढरपूरची यात्रा असून यासाठी जिल्हाभरातून हजारो प्रवासी पंढरपूरकडे जातात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जळगाव विभागातर्फे पंढरपूर वारीसाठी १३५ बसेस सोडण्यात येणार आहे. तीन टप्प्यात या बसेस सोडण्यात येणार आहेत. यंदा महिला, ज्येष्ठ नागरिक सवलतीमुळे वारीतील प्रवाशांची संख्या २५ टक्के वाढणार असल्याने जादा बसेल धावतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी इतर आगारांना मदत म्हणून यंदा जालन्यासाठी ५०, अहमदनगरसाठी ७५ बसेस पाठवण्यात येणार आहे. या १२५ बसेस तिकडे जाणार असल्या तरी यामुळे जिल्ह्यांतर्गत कोणत्याही फेऱ्या कमी होणार नाहीत. तीन टप्प्यात बसेस सोडण्यात येणार आहेत.
पहिला टप्पा २४ ते २५ जून दरम्यान जिल्ह्यातून १०० बस सोडण्यात येणार आहेत. २६ ते २७ जून दरम्यान १२५ बस तर २८ व २९ जूनला ४० बसेस पंढरपूरला धावणार. परतीच्या प्रवासासाठी ३० जूनला द्वादशीला पंढरपूर आगारात या १३५ बसेस तैनात असणार आहे. तसेच एकाचवेळी ३० पेक्षा अधिक प्रवाशी, परिवार असल्यास पंढरपूरसाठी बस सोडली जाणार असल्याचेही वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.