⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या धर्तीवर गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर (कॉरिडॉर) निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज ४ एप्रिल २०२२२ । लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्‍यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली आहे त्याच पद्धतीने माझ्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जल प्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर “गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)” ची योजना घोषित होईल का? असा सवाल उपस्थित केल्याने गिरणा काठाच्या शेतकऱ्यांच्या विकासाची मुहूर्तमेढ आरंभली असुन लोकसभेत गिरणाईचा आवाज गुंजला आहे. लोकसभेच्या पटलावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गिरणा माईच्या शाश्वत विकासाचा प्रश्न मांडण्यात आल्याने गिरणा खोऱ्यात खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
आज लोकसभेच्या अधिवेशनात खासदार उन्मेश पाटील यांनी गिरणा नदीच्या शाश्वत विकासासाठी एक पाऊल टाकीत
गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या धर्तीवर गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर (कॉरिडॉर) निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय आहे का ? असा सवाल उपस्थित केला. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एक जानेवारी पासुन गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत सुमारे चारशे किलोमीटर ची पाईप आज येत पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेत ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची सुसंवाद साधला असून गिरणा काठाच्या शाश्वत विकासाची विकासासाठी सोबत काम करण्याचे आवाहन करत आहे. याच अनुषंगाने आज खासदार उन्मेश पाटील यांनी गिरणा माईच्या काठावर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून केंद्र सरकारने
ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्‍यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा केली आहे त्याच पद्धतीने माझ्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जलप्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर “गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)” ची योजना राबविण्याची विनंती केली.
या प्रश्नाच्या उत्तरात मा.कैलास चौधरी (राज्यमंत्री, कृषि, भारत सरकार) यांनी खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न बद्दल त्यांचे अभिनंदन करून माननिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्न आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे क्षेत्र व शेतकरी बांधवांची संख्या वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून जैविक शेती, परंपरागत कृषी विकास योजना या महात्वाकांक्षी योजना शासन राबवित आहे. या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात नमामी गंगे प्रकल्पांतर्गत गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर करिता रक्कम रु.120 कोटी ची तरतुद करण्यात आली आहे.
.