जळगाव शहर

क.ब.चौ.उमवि व केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या माध्यामतून शिवणकला अभ्यासक्रमला सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २५ जुलै २०२१|  केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मान्यतेने शिवणकच्या अभ्यासक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ प्रिती अग्रवाल, रोटरी क्लब ऑफ ईलाईट चे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव वैजयंती पाध्ये, सेवावस्ती विभाग प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक जोशी, प्रकल्प सहप्रमुख मनिषा खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हरिविठ्ठल नगर येथे करण्यात आला.

केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याने विद्यापीठामार्फत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असल्याचे मनिषा खडके यांनी सांगितले. बेसिक आणि अॅडव्हान्स शिवणकला अभ्यासक्रम ३ महिन्याचा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठाना सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असते. विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचू शकत असल्याचे सांगितले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना विविध आस्थापना मध्ये व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जळगाव शहर व परिसरातील गरजू व शिवणकाम शिकू इच्छिणाऱ्या महिलांनी प्रवेशासाठी सेवावस्ती विभाग व्यवस्थापिका स्नेहा तायडे मो. ७७१९० ५५८१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button