जळगावात कामाच्या दबावातून क्रेडीट मॅनेजरची आत्महत्या

जून 21, 2021 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । शहरातील मयूर कॉलनीत मुथ्थूट होमफिन इंडीया लिमीटेडमधील क्रेडीट मॅनेजर यांनी कामाच्या दबावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप धनलाल कापुरे  (वय-४५)असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, प्रदीप कापुरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात कामावरच्या दबावातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

crime

 

शहरातील मयूर कॉलनीतील रहिवासी प्रदीप कापुरे हे  मुथ्थूट होमफिन इंडीया लिमीटेड मध्ये क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे ते गोंधळून गेले. या कामाच्या तणावातून त्यांनी आज सोमवार २१ जून रोजी पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. सदर बाब त्यांच्या पत्नी सुचिता ह्या मागच्या घरात गेल्या असता त्यांना पतीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रदीप कापुरे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी तीन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.  

त्यात त्यांनी म्हटले आहे की, जळगाव, धुळे जिल्ह्यातील मुथ्थूट होमफीन कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला असतांना ग्राहकांच्या समस्या, जुने प्रकरणे, नवीन प्रकरणे, त्यांच्या येणाऱ्या त्रृटी, ऑनलाईन वर्क, वसूली आदींसह सर्व कामे मी पाहत आहे. दरम्यान माझ्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची देखील जबाबदारी आल्यामुळे कामाचा ताण अधिक वाढत आहे. त्यामुळे हा ताण सहन होत नाही. त्यात मॅन पावर कमी आणि कामे जास्त अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या पश्चात वारस म्हणून सर्व योजनांचा लाभ माझ्या पत्नीला मिळावा यासाठी कंपनीतील अधिकारी व सहकारी यांनी सहकार्य करावे.  असे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांनी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now