जळगावात जोगत्याची गळफास घेवून आत्महत्या

नोव्हेंबर 20, 2021 9:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका २० वर्षीय जोगत्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Suicide by strangulation of a third party in Jalgaon jpg webp

रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमीजवळील रहिवाशी विक्रांत उर्फ विक्की उर्फ लैला मनोहर खरकार (वय-२०) या जोगत्या तरुणाने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी आक्रोश केला. विक्की तृतीयपंथी, जोगत्यांसोबत जोगवा मागण्याचे काम करीत होता. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मयत घोषीत केले.

शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now