क्रिकेट विश्व हादरले : या संघाच्या कर्णधारावर बलात्काराचा गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळलेल्या एका खेळाडूवर तर नेपाळ क्रिकेटच्या कर्णधारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने यावर एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछाने हा नेपाळचा पहिला खेळाडू आहे. 2018 मध्ये त्याला दिल्ली संघाने खरेदी केलं होतं. त्यावेळी संदीपचं वय हे 17 वर्षे इतकं होतं. 20 लाखांना दिल्ली संघाने आपल्या ताफ्यामध्ये सामील केलं होतं.
संदीप हा लेग स्पिनर असून त्याने 2016 च्या अंडर-19 विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी नेपाळचा संघ आठव्या स्थानावर राहिला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायरल क्लार्कसुद्धी संदीपच्या कामगिरीने प्रभावित झाला होता. संदीप केनियाविरूद्धच्या दौऱ्यात खेळत असून संघाच्या नेतृत्त्वाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. मात्र आता बलात्काराच्या गुन्ह्यामुळे त्याचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे.