क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तालुक्यात उत्साहात साजरी

एप्रिल 11, 2022 7:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ ।

महात्मा फुले

जामनेर तालुक्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सामाजिक संघटना यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी केली.

जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार अरुण शेवाळे नायब तहसीलदार सुभाष कुंभार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जामनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

तसेच माळी गल्ली येथील श्री संत सावता महाराज यांच्या मंदिरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले संध्याकाळी सहा वाजता क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकीत राज्याचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन नगराध्यक्ष साधना महाजन यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले व मिरवणुकीत सहभागी झाले महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त श्रीलीला
हॉस्पिटल जामनेर आयोजित महारक्तदान शिबिर आज महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमाना अभिवादन करण्यात आले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories