⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

कडक उन्हामुळे विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवातील पथसंचलन रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । शहादा येथे १९ ते २३ एप्रिल या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवारंग महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता घेऊन महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे आयोजन समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले. उन्हामुळे यंदा पथसंचलनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित युवारंग युवक महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली जात आहे, याची माहिती आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. एस. पाटील व डॉ. सुनील पवार यांनी दिली. १९ एप्रिल रोजी दुपारी काढण्यात येणारी शोभायात्रा उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेस खुल्या रंगमंचावर स्पर्धा होणार नाहीत. वेळापत्रकात नव्याने बदल करून सकाळी लवकर स्पर्धा सुरू होतील. तसेच २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उद्घाटन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच विविध

बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. के. एफ. पवार, प्राचार्य आर. एस. पाटील, डॉ. सुनील पवार, अधिसभा सदस्य प्राचार्य ए. टी. पाटील, डॉ. सुनील गोसावी, नितीन ठाकूर, अमोल मराठे, अमोल सोनवणे, प्रा. प्रकाश अहिरराव, प्रा. ई. जी. नेहेते, डॉ. के. जी. कोल्हे, डॉ. पवन पाटील, डॉ. राम पेठारे, प्रा. अजय पाटील, प्रा. सुनील कुंवर, कोकिला पाटील, श्रीराम दाऊतखाने, डॉ. मालिनी आढाव, डॉ. अनिल साळुंखे, डॉ. ईश्वर जाधव उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी आभार मानले.