एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी, वाचा कुणी केले वक्तव्य
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । शिवसेना विरुद्ध शिंदे सेना हा वाद संपत नसतानाच खरे हिंदुत्व कुणाचे असा नवीन मुद्दा पुढे येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध सर्वांना माहिती असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे हिंदु धर्माचे गौरव पुरूष आहेत. तेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे.
राज्यात सरकार उलथापालथं होत असताना शिवसेनेचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे, अशी टीका होत केली जात होती. गेल्या अडीच वर्षातील अनेक उदाहरणांची त्यास जोड दिली जात होती.नुकतेच योग गुरु रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानं राजकारणात नवीच चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे हिंदु धर्माचे गौरव पुरूष आहेत. तेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी रामदेव बाबांनी भेट घेतली. मुख्यमंत्री आमच्या हिंदु धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मसोबतच ते सनातन, ऋषीधर्मालाही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आमची आत्मीयता आहे. त्यांचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेचं हिंदुत्व कधीच संपलंय, अशी टीका भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येते. तर हिंदुत्वाच्या नावाखाली सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ शिंदेंनी खेळी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येतो. भाजपने आधीपासूनच हिंदुत्वाच्या मुद्द्याचा अजेंडा लावून धरलाय. मात्र एकनाथ शिंदे यांची भेट घेत रामदेव बाबांनी त्यांना हिंदु धर्माचे गौरव पुरुष म्हणल्याने नव्याच चर्चांना उधाण आले आहे