⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आमदार चव्हाणांमुळे ३ रुग्णांना मिळाली ४ लाखाची मदत

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील तीन रुग्णांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच आठवड्यात जवळपास ४ लाखांची आर्थिक मदत मिळाली असून त्यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. (MLA Mangesh Chauvhan Helped People)

चाळीसगाव तालुक्यातील‍ि पिंपळगाव येथील रहिवासी सदानंद हरिश्चंद्र चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपये, चाळीसगाव येथील मनोज साहेबराव साळुंखे यांना कॅन्सर वरील उपचारासाठी १ लाख रुपये, खडकीसीम येथील भगवान वाल्मिक चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपये असे मंजूर झाले आहेत. तात्काळ सदर मदत मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीषभाऊ महाजन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत. (Mla mangesh chauvhan helped Voters)

गरजू रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधावा- मंगेश चव्हाण
चाळीसगाव तालुक्यात विविध आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यास सुरुवात केली होती मात्र २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी हा मदत कक्ष जवळपास बंदच केला होता मात्र आता पुन्हा शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम जोमाने सुरु झाले असून कोट्यावधींची मदत काही महिन्यातच रुग्णांना देण्यात आली आहे. माझ्या चाळीसगाव येथील अंत्योदय जनसेवा कार्यालयात देखील यासाठी विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून गरजू रुग्णांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. (Ask for help Mla mangesh Chauvhan)

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१. अर्ज ( विहीत नमुन्यात) आमदार कार्यालयात मिळेल
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.
१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण