⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

मोठी बातमी! भाजपचे खासदार उन्मेष पाटीलांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश निश्चित?

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र याच दरम्यान, राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून शिवसेना ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे.

उन्मेष पाटील संजय राऊतांची भेट घेऊन त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याबाबतचा निर्णय पक्का करतील, अशी माहिती समोर येत आहे. विशेष उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. याशिवाय जिल्ह्यातील भाजपचे बडे पदाधिकारी देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.

यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.