⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आयुक्तांनी डॉ. राम रावलानी यांना बजावली कारणे दाखवा नोटीस

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनीषा उगले, मनपा वैद्यकीय अधिकारी व डॉ राम रावलानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, मुंबई यांनी आज दि.१५/११/२०२२ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २४ हेल्थ वेलनेस सेंटर संदर्भात बैठक आयोजित केलेली होती. बैठकीत मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, मुंबई यांना देण्यात आलेली आकडेवारी ही चुकीची असल्याचे निदर्शनास आलेले असुन सदरची आकडेवारी कुणी दिली. याबाबत त्याच वेळेस विचारणा केली असता संबंधित वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना सुध्दा सांगता आले नाही. त्यामुळे आपला याबाबतीत किती हलगर्जीपणा आहे हे दिसुन येते.

तसेच उपरोक्त बैठकीनंतर टास्क फोर्स (लसीकरण) संदर्भात सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच G.N.M यांचेसोबत दवाखाना विभागाने बैठक आयोजित केलेली होती. सदर बैठकीचे कोणतेही नियोजन आपलेकडुन करण्यात आलेले नव्हते व लसीकरणाबाबत आकडेवारीचे विविरण पत्र तसेच आकडेवारी अचुक देण्यात आलेली नव्हती. उपरोक्त दोन्ही बाबी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असुन याबाबत तिन दिवसात खुलासा सादर करावा. अन्यथा आपलेविरूध्द पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.असे संबंधित नोटीसमध्ये लिहिले आहे.