⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

अंत्यविधी साठी जागा पुरत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व खर्चाने स्मशानभूमीची केली स्वच्छता…!!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । कोविड 19 चा थैमान वाढला आहे. मृत्यू दरात देखील वाढ झाल्याने स्मशान भूमीत अक्षरशः अंत्यविधी साठी जागा पुरत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अश्या भयावह परिस्थितीत अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.शहरातील तरुण युवा कार्यकर्ते यांनी अंत्यविधी स्थळी नागरिकांना जागा होत नसल्याचे  कारण शोधत स्मशान भूमीत अस्ताव्यस्त पडलेली झाडे, लाकूड यामुळे जागा अडकली होती. तसेच मोठ्या प्रमाणात अंत्यविधी झाल्याने अस्थी एवढी मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे की ती गोळा करणे शक्य होत नाही आहे.तरी यास अनुसरून माजी उपनगराध्यक्ष गोपीभाऊ कासार, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ भांडारकर यांनी नगरपरिषदेस विनंती केली परंतु वारंवार नगरपरिषदेस जे सी बी मशीन ची मागणी  सदर ठिकाणी सफाई करण्याकामी केली तरी देखील प्रशासना तर्फे दुर्लक्षित केले जात  असल्याचे  लक्षात येताच.

शेवटी सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ भांडारकर यांनी स्व मालकीचे जे सी बी पाठवत स्वच्छता करण्यात आली.प्रसंगी गोपीभाऊ कासार,पंकज चौधरी यांनी स्वतः थांबून सदर स्वच्छता करून घेतली. त्याच प्रमाणे अंत्यविधी करणाऱ्या तरुणांकरिता हाताचे ग्लोज देखील भेट म्हणून देण्यात आले.यामुळे नागरिकांनी ह्या जागृत सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतूक केले आहे. नगरपरिषदेला वारंवार विनंती करून देखील अश्या भावनिक विषया कडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आहेत.