⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नगरपरिषद निवडणूक : एरंडोलात आजपासून कार्यक्रम जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । गेल्या काही महिन्यापासून प्रतिक्षा लागून असलेल्या एरंडोल नगर परिषदेच्या निवडणूकीचा कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे. परिपत्रक काढून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून ८ जुलैपासून आचारसंहिता लागून झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी यासाठी मतदान होणार असून १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

यासाठी आजपासूनच कार्यक्रम जाहीर झाला आहे. एरंडोलमध्ये एकूण ११ प्रभागातून २१ नगरसेवकांची निवड होणार आहे. प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक दहापर्यंत प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार आहेत तर प्रभाग क्रमांक ११ मधून तीन नगरसेवक निवडून येतील. महिला नगरसेविकांची संख्या १२ असून सर्वसाधारण जागा अकरा असतील या निवडणुकीत २९ हजार ७२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. गेल्या पंचवार्षिक मध्ये एकूण दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडून आले होते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३४ हजार २०० इतकी आहे.