जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । गेल्या काही दिवसांपासून कर्तृत्वशून्य अशी काही बोबडे आपल्यावर टीका करत आहेत. त्यांनी केलेली टीका त्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका कर्तृत्वशून्य असल्यामुळे आपलं लक्ष भरकटाहेत प्रयत्न करत आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या अन्वर हल्लाबोल के
जेव्हा १ मे रोजी आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करत होतो तेव्हा भाजपच्या सभेत फडणवीस चुकून बोलून गेले कि त्यांना मुंबई स्वतंत्र करायच आहे. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली
छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी मास घातला नव्हता. ते मास्क काढून म्हणाले की तुमच्याप्रमाणे मलाही आज मुक्त वाटतय आणि मी देखील बर्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे.
त्यावेळी ते म्हणाले कि, मी काही दिवसांपूर्वी गदा हातात धरली होती. त्यावेळी त्यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शिवसेनाही गधाधारी आहे. हो आम्ही गधाधारी होतो अडीच वर्षापूर्वी आम्ही गध्याला सोडून दिले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.