खुशखबर! चांदीत 4000 रुपयांनी तर सोने 1300 रुपयांनी घसरले, आताचे भाव पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । सोने आणि चांदी दरात चढ-उताराचे सत्र कायम असून सलग दोन दिवस मोठी वाढ झालेल्या दोन्ही धातूंच्या दरात एकाच दिवसात मोठी घसरण झाली. जर तुम्हीही आज सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा..
जळगावच्या सराफ बाजारात शुक्रवारी सोने १३०० रुपये प्रति तोळ्याने स्वस्त झाले. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल ४ हजार रुपयांनी घसरून ९२,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला.
दिवाळीनंतर आता लगीनसराई सुरु झाली आहे. लग्न म्हटल्यावर दागिने घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. सोन्याच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्यासह चांदी दरात वाढ होताना दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने ७६,६०० रुपयावर तर चांदी ९३००० रुपये प्रति किलोवर होती. यात शुक्रवार सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव ७८७०० रुपये तर चांदीचा भाव ९६००० रुपयावर होता.