⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जिल्हा परिषद विशेष : २१ जागांवर भाजप देणार ओबीसी चेहेरे

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा परिषद विशेष । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वी ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नसल्याचे म्हटले जात आहे. या अनुशंघाने भारतीय जाणता पक्षा तार्फे २७ टक्के जागांवर ओबीसी उमेदवार देवू अशी भूमिका जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयाेगच्या नव्या रचनेनंतर जिल्ह्यात ७७ जिल्हा परिषद गट तयार हाेणार आहेत. यापैकी २१ जागांवर भाजपकडून ओबीसी उमेदवार दिले जाणार आहेत याअनुषंगाने जिल्हा अंतर्गत हालचालींनी वेग घेतला आहे. तशा राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत ६७ जिल्हा परिषद गटांपैकी १८ जागांवर ओबीसी उमेदवार देण्यात आले हाेते. आता खुल्या प्रवर्गासाठीच्या गटांपैकी २१ गटांत भाजपकडून ओबीसी उमेदवार दिले जाणार आहेत. ओबीसी माेर्चाच्या मेळाव्याव विराेधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घाेषणा केल्यानंतर जिल्ह्यात तातडीने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या ओबीसी उमेदवारांनी त्यांच्या पंचायत समिती गणातील साेबत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या नावासह स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या गाठी-भेटी सुरू केल्या आहेत. रविवारी बहुतांश ओबीसी इच्छुक उमेदवारांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. या हालचाली अजून गतिमान होतील.

भाजपने ज्या गटांत ओबीसी उमेदवार दिले त्याच गटांत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उमेदवार द्यावेत अशी इच्छा व्यक्त करत त्या-त्या पक्षातील ओबीसी सेलचे पदाधिकारी आग्रही आहेत. त्यासाठी इच्छुक ओबीसी उमेदवारांनी साेयीच्या असलेल्या गटात अन्य आरक्षणाचा अंदाज बांधून तयारी सुरू केली आहे.