⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | युवसेनेच्या अधिवेशनाला जळगावातून देखील युवासैनिक जाणार

युवसेनेच्या अधिवेशनाला जळगावातून देखील युवासैनिक जाणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे “झंझावात” हे राज्यव्यापी अधिवेशन ८ आणि ९ जानेवारी २०२२ रोजी नाशिकला होत आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याला विशेष महत्त्व असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एकप्रकारे ही पर्वणीच ठरणार आहे. यासाठी जिल्ह्यातून ४८ पदाधिकारी अधिवेशनात सहभागी होणार आहे.

डॉ.एपीजे अब्दुल कलाम कन्व्हेन्शन सेंटर, नानाच्या मळ्याजवळ पपय्या नर्सरी (सातपूर) येथे होणाऱ्या या मेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवासेनेचे २००० हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या तयारीबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नाशिकला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिरावर मोठी जबाबदारी येणार असून ती पार पाडण्यासाठी ही फळी किती तत्पर आहे याची चाचपणीही या दोन दिवसांच्या नाशिक अधिवेशनात होणार असल्याचे वरुण देसाई यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. त्यानंतर देसाई यांनी अधिवेशन स्थळाची पाहणीही केली. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर महानगरातील कायदा व सुव्यवस्था तसेच इतर अन्य प्रश्नांवर चर्चा केली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व कसोशीने प्रयत्न करू, असे युवासेना सहसचिव विराज कावडीया यांनी सांगितले.

नियोजनाच्या शिवसेना नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवासेना कोषाध्यक्ष व नगरसेवक अमेय घोले, सुप्रदा फातर्पेकर, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक सिद्धेश शिंदे, अजिंक्य चुंभळे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपुरे आदींसह युवासेनेचे जिल्हा व महानगरातील पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने समारोप होणार

युवासेना प्रमुख तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, कृषिमंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अन्य मंत्री अधिवेशनास उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ९ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन एकनाथ शिंदे करतील तर समारोप संजय राऊत यांच्या भाषणाने होईल. तसेच दुसऱ्या सत्राचा शुभारंभ सुभाष देसाई करणार आहेत. तर अधिवेशनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होईल. जळगाव जिल्ह्यातून युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, चंद्रकांत शरण यांच्या नेतृत्वात ४८ पदाधिकारी अधिवेशनात सहभागी होणार आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील समस्त आमदार, शिवसेना पक्ष पदाधिकारी यांनी युवासैनिकांना अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह