जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह ४ जानेवारी रोजी सायंकाळी पिंप्राळा भागातील भवानी माता मंदिर परिसरातून करण्यात आला. यादरम्यान भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ. युगंधरा अमित सोळुंके यांची नियुक्ती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.
यांची होती उपस्थिती?
याप्रसंगी यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष सौ. नितू परदेशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.






