जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारी अखेर महायुतीच्या तब्बल १२ उमेदवारांची बिनविरोध निवड झालीय. यामध्ये भाजपच्या ६ तर शिवसेना शिंदे गटाच्या सहा जागा बिनविरोध झाल्या.

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारांनी अर्ज केले होते. पैकी छाननीअंती ९०३ अर्ज वैध ठरले होते. १ आणि २ जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत होती. माघारी अखेर अनेक उमेदवारांनी माघारी घेल्याने काही प्रभागातील जागा बिनविरोध झाल्या आहेत. एकूण ७५ जागांपैकी महायुतीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या ६ आणि शिंदे गटाच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे.

बिनविरोध निवड झालेल्या उमेदवाराचे नाव?
भाजपचे बिनविरोध उमेदवार?
प्रभाग ७ अ मधून दिपमाला काळे
प्रभाग ७ ब मधून अंकिता पाटील
प्रभाग ७ क मधून विशाल भोळे
प्रभाग १२ ब मधून उज्ज्वला बेंडाळे
प्रभाग १३ क मधून वैशाली अमित पाटील
प्रभाग १६ अ मधून डॉ. विरण खडके
शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार?
प्रभाग २ अ मधून सागर सोनावणे
प्रभाग ९ अ मधून मनोज चौधरी
प्रभाग ९ ब मधून प्रतिभा गजानन सोनवणे
प्रभाग १८ अ मधून डॉ.गौरव सोनवणे
प्रभाग १९ अ मधून रेखा पाटील
प्रभाग १९ ब मधून गणेश उर्फ विक्रम सोनवणे











