जळगाव : नऊ रीळ नायलॉन मांजा जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल

जानेवारी 4, 2026 8:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । न्यायालयाने नायलॉन मांजावर घातलेल्या बंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिस दल मोहीम राबवत असून अशातच एमआयडीसी पोलिसांनी अयोध्या नगरातील एका दुकानातून सहा हजार रुपये किमतीचा नऊ रीळ नायलॉन मांजा जप्त केला. या प्रकरणी मनोज गणेश चिनावले (३८, रा. म्हाडा कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

manja

अयोध्यानगरमधील श्रीगणेश नॉव्हेल्टी दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीवरून तपासणी केली असता तेथे ४२०० रुपये किमतीचा मोनो काइट लिहिलेला नायलॉन मांजाचे सहा रीळ व विना लेबलचे तीन रीळ असे एकूण ६३०० रुपये किमतीचे नऊ रीळ जप्त करण्यात आले आहेत.

पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे करीत आहे. दुकान मालक मनोज गणेश चिनावले याच्या विरुद्ध बीएनएस कलम १२५ व २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांनी नायलॉन मांजा विक्री विरुद्ध मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्यानंतर शहरात आठवडाभरात करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now