भुसावळ हादरले ! सिमेंटची कुंडी डोक्यात घालून तरुणाची निर्घृण हत्या

फेब्रुवारी 28, 2026 4:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ४२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ वादातून अनिल ऊर्फ पिंटू आत्माराम सावकारे (४२) या तरुणाचा सिमेंटची कुंडी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकारामुळे भुसावळ मधील गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

crime 7 jpg webp

काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आनंद नगरला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले आणि समोरच्या व्यक्तीने रागाच्या भरात अनिल सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची जड कुंडी घातली. या भीषण हल्ल्यात सावकारे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाली. डीवायएसपी केदार बारबोले बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now