जळगाव शहरात पुन्हा अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत २० वर्षीय तरुण ठार

मे 26, 2025 2:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना पाहायला मिळत असून अशातच जळगाव शहरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाला जीव गमवावा लागला आहे. प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) असे मयत तरुणाचे नाव असून ही घटना आज २६ रोजी शहरातील अजिंठा चौफुलीजवळ घडली.

prem thakur

जळगाव शहरातील शिंदे नगरात प्रेम ठाकूर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सचे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास प्रेम हा शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेम ठाकूर हा ठार झाला आहे.

ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment