⁠ 
सोमवार, मे 6, 2024

किटकनाशकांचे सेवन करून तरुणाचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट.

जळगाव लाईव्ह न्यूज| २५ जुलै २०२३। यावल तालुक्यातील सावखेडा येथील तरुणाने पिकांवरील औषध सेवन केल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. विषारी औषध सेवन करण्यामागचे कारण अद्यापही समजले नाही. याप्रकरणी २४ जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूषण अशोक पाटील (वय ३३) हा तरुण यावल तालुक्यात सावखेडा येथील रहिवासी आहे. आई-वडील आणि मोठा भाऊ असा त्याचा परिवार आहे. भूषण हा शेती काम करत होता. तसेच काही दिवसांपासून तणावात देखील होता. रविवारी २३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी

पिकांवरील फवारणीचे औषध सेवन केलं. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईक मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी दहा वाजता शवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या यांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमार आणि प्रशांत सैंदाणे करीत आहे.