⁠ 
सोमवार, मे 27, 2024

जळगावकरांना ‘या’ दिवशी अनुभवता येणार शून्य सावली दिवस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । आपली सावली आपली कधीही साथ सोडत नाही असं म्हटलं जात. मात्र, वर्षभरात काही भौगोलिक घटना घडतात. ज्यामुळे वर्षातून दोन वेळा काही वेळासाठी आपली सावलीदेखील आपली साथ सोडत असते. दरम्यान, जळगावकरांना शून्य सावलीचा क्षण अनुभवता येणार आहे. २२ ते २६ मे दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सावली गायब होणार आहे. खगोलीय भाषेत या प्रकाराला शून्य सावली दिवस म्हटले जाते.

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २२ ते २६ मे दरम्यान, शून्य सावलीचा क्षण नागरिकांना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात.

उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० डीग्री सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते

जळगाव जिल्ह्यात अनुभवता येणार शून्य सावली दिवस
२२ मे चाळीसगाव.
२४ मे- जामनेर.
२५ मे जळगाव, भुसावळ, अमळनेर,
२६ मे चोपडा, यावल, रावेर, बोदवड,