जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२४ । शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींना व्यवसाय करण्याच्या उद्देशाने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. एन.एस.टी.एफ.डी.सी.नवी दिल्ली (राष्ट्रीय अनुसुचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली) पुरुस्कृत कर्ज योजनांच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत आदिवासी लाभार्थ्यांकरीता स्वंयमरोजगारासाठी सन २०२४-२५या आर्थिक वर्षाकरीता मुख्य कार्यालय, नाशिक यांचेकडुन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय, यावल (कार्यक्षेत्र जि. जळगांव. बुलढाणा. जालना व छत्रपती संभाजीनगर) अंतर्गत कर्ज योजना राबविणे कामी लक्षांक प्राप्त झालेला आहे.
त्यापैकी महिला सबलीकरण योजना. रु.२ लक्ष कृषी आणि संलग्न योजना. रु.५ लक्ष हॉटेल /ढाबा व्यवसाय योजना रु.५ लक्ष ऑटो वर्कशॉप / स्पेअरपार्ट रु.५ लक्ष वाहन व्यवसाय योजना रु.१० लक्ष, लघुउद्योग योजना रु.३ लक्ष ऑटो रिक्षा/मालवाहु रिक्षा रु. ३ लक्ष स्वयंमसहाय्यता बचतगट रु.५ लक्ष याप्रमाणे लक्षांक प्राप्त झालेला असुन यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेसाठी शवरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळ www.mahashabari.in यावर दि.०९ ऑगस्ट, २०२४ पासुन १५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत ऑनलाईन कर्ज वितरण प्रणाली अंतर्गत कर्ज वितरण प्रणाली वर क्लिक करून सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.
व सदर फाईल शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालयः यावल येथे जमा करण्यात यावी, असे आवाहन शाखा व्यवस्थापक गौरव चौधरी यांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. याची नोंद घेण्यात यावी. असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक शाखा कार्यालय, यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.