अत्यंत दुर्दैवी! पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ अपघातात ठार

जुलै 8, 2024 10:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील शोरूमजवळ घडली. तर त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. झाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील यांच्यासह राहत होता.

mahesh mali jpg webp

एका दाल मिल कंपनीत तो काम करीत होता. तर त्याचे आई वडील हे एमआयडीसीतील एका कंपनीत वॉचमन आहेत. महेश व त्याचा मित्र आकाश पाटील हे नशिराबादच्या पुढे महेंद्र शोरूम येथे कामानिमित्ताने ये जा करायचे. शनिवारी रात्री महेंद्र शोरूम येथे गेले होते. त्यावेळेला रात्री ११ वाजेच्या सुमारास गतिरोधकावरून त्यांची दुचाकी नियंत्रणाबाहेर गेली व दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात महेश माळी व आकाश पाटील गंभीर जखमी झाले.

दरम्यान, महेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पाच बहिणींच्या पाठीवरील एकुलता एक भाऊ असल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आकाश पाटील हा जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नशिराबाद पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now