जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । घरात पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना जळगावला लागून असलेल्या खेडी खुर्द येथे घडली असून दीपक प्रभाकर पाटील (वय-३७) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?

खेडी खुर्द येथील दीपक हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो गेल्या काही दिवसापासून आजारी होता. त्यामुळे तो घरीच राहत होता. त्याची पत्नी मुलासह माहेरी गेली असल्याने दीपकने सोमवारी रात्री खालच्या मजल्यावर राहत असलेल्या आपल्या आई-वडीलांकडे जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी १० वाजले तरी दीपक उठला नसल्याने त्याचे वडील दीपक झोपलेल्या ठिकाणी गेले. याठिकाणी दरवाजा आतून बंद असल्याने त्याच्या वडीलांनी खिडकीतून बघितले असता, दीपक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर आपल्या कुटुंबियांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. पाय घसरून पडल्याने दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन










