ट्रॅक्टर पलटी झाल्याने दबून तरुणाचा मृत्यू

मे 26, 2021 6:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका २० वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबुन मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात आज बुधवारी दुपारी घडली. कैलास तुकाराम राठोड (वय-२० रा. रामदेव वाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, कैलास  राठोड हा आयटीआय मध्ये शिक्षण घेणारा तरूण विद्यार्थी आपल्या स्वत:च्या वावडदा शिवारातील शेतात शेतात ट्रक्टरने टिलर करण्याचे काम करत होता. यावेळी ट्रक्टरने काम करत असतांना बंधाऱ्यावर वळवतांना अचानक ट्रक्टर पलटी झाले. त्या ट्रॅक्टरखाली दबुन कैलास राठोड याचा मृत्यू झाला. मुलाचा ट्रॅक्टरखाली मृतदेह पाहून आईवडीलांना हंबरडा फोडला होता.

शिवारातील शेतकऱ्यांनी तातडीने ट्रॅक्टर बाजूला करून मृतदेह काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि विशाल राठोड करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories