बेरोजगारीला कंटाळुन रावेर येथील तरुणाची आत्महत्या

एप्रिल 7, 2021 5:59 PM

रावेर शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. शहरात एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. प्रमोद जगन्नाथ महाजन (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  

crime

प्रमोद महाजन याने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रमोद विवाहीत होता. त्याला एक वर्षाचा मुलगा देखील आहे.या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. प्रमोद हा काही दिवसांपासुन काम नसल्याने त्रस्त होता असे मयत प्रमोद यांचे मोठे बंधु गणेश महाजन यांनी सांगितले. रावेर पोलिसात अकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now