६ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या

मार्च 16, 2022 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या कर्जबाजारी तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे उघडकीस आली. भरत भिकन पाटील (वय-२३) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

bharat patil succied jpg webp

काय आहे घटना?
भादली बुद्रुक येथे राहणार भरत पाटील हा आई-वडील, पत्नी व लहान भावासह वास्तव्याला आहे. चारचाकी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. भारतने काही दिवसांपूर्वी कर्ज काढून चारचाकी वाहन घेतले होते. त्याशिवाय विविध सोसायटीचेही त्यावर कर्ज होते. त्यामुळे तो नैराश्यात होता व त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, भरत आणि त्याचा लहान भाऊ हे दोघे जण गाडी चालवतात. पुणे, नागपूर, मुंबई आणि गुजरात या ठिकाणी लांब पल्ल्याच्या ठिकाणी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान लहान भाऊ हा मुंबईला गाडी घेऊन ट्रीपसाठी गेला होता.

भरतने घराच्या मागच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १५ मार्च रोजी सकाळी उघडकीला आले. हा तिचा मृतदेह पाहून पत्नीसह आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now