पातोंडीमध्ये युवकाने गळफास घेत संपविले जीवन

ऑगस्ट 24, 2021 6:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट । रावेर तालुक्यातील पातोंडी येथे ३४ वर्षीय युवकाने मंगळवारी मध्यरात्री आत्महत्या करीत आपले जीवन संपविले. दरम्यान, या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

crime jpg webp

पातोंडी येथील रहिवासी विकास उर्फ बापु मधूकर ढाकणे वय-३४ या तरुणाने मंगळवारी मध्यरात्री घरात कोणीही नसतांना दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे वडील मधुकर विठ्ठल ढाकणे यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now