जेवण करून सर्वजण झोपले अन्‌ मध्यरात्री त्याने घेतला गळफास

मार्च 6, 2022 1:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । जळगाव शहरातील नाथवाडी येथील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. राहुल विजय चौरसिया वय 30 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

crime jpg webp

काय आहे घटना?

शहरातील नाथवाडी भागात राहणार राहूल चौरसिया हा तरूण आई व लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. राहूलचे याचे नवीन बसस्थानकाच्या बाजूल असलेल्या भज्जे गल्ली फळ विक्रीचे दुकान असून तो फळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

दरम्यान, शनिवार ५ मार्च रोजी रात्री राहूल जेवण करून झोपला होता. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असता गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्याचा भाऊ हर्षल यांच्या लक्षात आल्याने घटना समोर आली. त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निळकंठ महाजन यांनी मयत घोषीत केले.

सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी सचिन मुढे व शांताराम पाटील करीत आहे. मयताच्या पश्चात आई किरण व भाऊ हर्षल असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now