जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश गुलाबसिंग ठाकूर (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना मंगळवारी २८ डिसेंबर रेाजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नीलेश ठाकूर हा मजूरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २८ डिसेंबर रेाजी नीलेशचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते. त्यावेळी निलेश हा घरात एकटाच होता. घराला आतून बंद करून दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरूणाच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोहेकॉ विजय पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :
- जामनेर हादरले ! आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या
- जळगावात 62.07 ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद; ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त
- आरपीएफची भुसावळ स्थानकावर धडक कारवाई; अमृत भारत एक्स्प्रेसमधून लाखोंचा गांजा जप्त!
- अमळनेर पोलिसांचे धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’; गावठी पिस्टल, तलवारीसह अवैध धंद्यांवर मोठी कारवाई!
- मोजणीच्या कामासाठी शेतकऱ्याकडून ७१ हजारांची लाच; जळगावातील भूकरमापकासह डेटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात











