जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 8, 2021 2:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील गुरूनानक नगरातील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रितीक प्रेम पवार (वय-३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

crime

रितीक पवार हा आपल्या आईवडील व बहिणीसोबत राहतो. शनिवारी ७ एप्रिल रोजी आई आरती आणि वडील प्रेम दुलीचंद पवार हे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रितीकने राहत्या घरातील मागच्या खोलीत दोरीने गळफास घेतला. हा प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला होता. त्यांनी तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरूणाने गळफास घेतल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

आज ८ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात आई आरती, बहिण निकिता आणि वडील प्रेम पवार असा परिवार आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रघुनाथ महाजन करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now