शेतातील झाडाला गळाफास घेवून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

फेब्रुवारी 2, 2023 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । जळगाव तालुक्यातील धानवड येथील भरत युवराज पाटील (४०) या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

galfas

धानवड येथील भरत पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेती करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी सकाळी ते शेतात गेले होते. शेतातील एका झाडाला त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार जवळच असलेल्या एका शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्या शेतक-याने ही घटना लागलीच ग्रामस्थांना सांगितली. नंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात वाहनातून नेला.

यावेळी रूग्णालयात लहान भाऊ आणि बहिणीने एकच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई देवकाबाई, पत्नी ललिता, लहान भाऊ राजेंद्र, विवाहित बहिण, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now