जळगाव जिल्हारावेर

राज्यस्तरीय स्पर्धेत योगिता चौधरी‎ प्रथम‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । महिला सक्षमीकरण व‎ ‎उद्योजकता‎ विकास समिती‎ ‎आणि खामगाव‎ ‎येथील गो.से.‎ ‎विज्ञान कला व‎ ‎वाणिज्य‎ महाविद्याल यांच्या संयुक्त माध्यमाने आयोजित‎ राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन‎ स्पर्धेतील खुल्या गटात शेंदुर्णी‎ येथील डॉ. योगिता पांडुरंग चौधरी‎ यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.‎

जागर स्त्री-पुरुष समानतेचा या‎ उपक्रमाच्या अंतर्गत ३ ते १२‎ जानेवारी-दरम्यान राज्यस्तरीय‎ काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले‎ होते. त्यात “एकविसाव्या‎ शतकातील जिजाऊ शिक्षिका मी’‎ या कवितेतून मांडत डॉ. योगिता‎ चौधरी यांनी परीक्षकांची मते‎ जिंकली. पारितोषिकाच्या स्वरूपात‎ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि‎ प्रमाणपत्र त्यांना प्राप्त होणार आहे.‎ याआधीही राज्यस्तरीय अविष्कार‎ संशोधन स्पर्धेत त्यांनी दोन वेळा‎ पारितोषिक प्राप्त केले आहे.‎

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button