रोहिणी खडसेंची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

ऑगस्ट 29, 2023 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहिणी खडसेंकडे राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.

rohini khadse jpg webp

मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत मुक्ताई शुगर मीलच्या चेअरमन रोहिणी खडसे यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

नाथाभाऊंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतांना रोहिणी खडसे यांनी देखील त्यांच्या सोबत हाती घड्याळ बांधले होते. मध्यंतरी त्यांना पक्षात मोठे पद मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. यातच पक्षात फूट पडून अजितदादा पवार गट स्वतंत्र सत्तेत सहभागी झाल्यामुळे ही चर्चा मागे पडली होती. तथापि, आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now